By  
on  

शाहरुख खान आणि काजोलची जोडी पुन्हा एकत्र येणार?

काजोल आणि शाहरुख खान या एव्हरग्रीन जोडीची जादू कुठल्या रसिकाला माहित नाही, असं होऊचं शकत नाही. दोघांच्याही केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलंय. दिलवाले दुल्हनियापासून अनेक सिनेमांद्वारे या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आता पुन्हा ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाली आहे.

२०१७मध्ये इरफान खानचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सिनेमाचा सिक्वल लवकरच येतोय आणि यातच काजोल-शाहरुखची जोडी एकत्र येणार आहे.

दिनेश विजन या सिनेमाचे निर्माते असून त्यात शाहरुख आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण अमेरिकेत होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. काजोल आणि शाहरुखने या सिनेमाची स्क्रिप्टही वाचली असून या सिनेमात काम करण्यास दोघांनीही होकार कळवल्याचं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान याची या सिक्वलमध्ये महत्तवपूर्ण भूमिका असून निर्मात्यांनी यासंदर्भात त्याची भेट घेऊन स्क्रीप्ट त्याला वाचून दाखवली ती आवडल्याने त्याने होकार दिलाय. यापूर्वी शाहरुख आणि इरफानने 'बिल्लू' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. निर्माते दिनेश विजन यांनी यापूर्वी 'कॉकटेल' आणि 'फाइंडिंग फॅनी'साठीही काम केलं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive