By  
on  

...म्हणून दीप-वीर हनिमूनला जाणार नाहीत

दीपिका-रणवीर या बॉलिवूडच्या सुपरहिट जोडीने साता समुद्रापार इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी शानदार  सोहळ्यात विवाहबध्द होत आपलं प्रेम सिध्दत्वास नेलं. हे लव्हबर्डस 14 व 15 नोव्हेंबर रोजी कोंकणी आणि सिंधी पध्दतीने लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्यांचं जबरदस्त रिसेप्सन मुंबई आणि बंगळूर येथे पार पडलं. मग दोघंही सिध्दीविनायकाच्या दर्शनाला गेले. त्यानंतर मग ही जोडी इशा अंबानीच्या शाही विवाहसोहळ्यात सहभागी झाली होती.

आता इतके सर्व सोहळे आणि कार्यक्रम झाल्यानंतर बॉलिवुडचं हे लाडकं कपल कधी हनिमूनसाठी रवाना होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण अजुन तरी त्यांच्या हनिमून प्लॅन्सची काही चिन्हं दिसत नाहीत. तर त्यामागचं कारण म्हणजे. रणवीरचा बहुप्रतिक्षीत सिंबा सिनेमा येतोय आपल्याला माहितच आहे. तर त्याच्याच प्रोमोशनमध्ये तो प्रचंड व्यस्त आहे. ‘सिंबा’मध्ये रणवीरसोबत सारा अली खानही प्रमुख भूमिकेत आहे. ते दोघंही रोहित शेट्टीसोबत या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. यावरुनच रणवीरला आपला सिनेमा आणि त्यासाठीची मेहनत करणं किती मनापासुन आवडतं हेच लक्षात येतं. त्यामुळे याच कारणास्तव या बाजीराव आणि मस्तानीने आपला हनिमून लांबणीवर टाकला आहे.

तर दुसरीकडे रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही लवकरच आपल्याल्या अॅसिड पिडीत लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या या महत्त्वकांक्षी सिनेमाचं काम ती लवकरच सुरु करणार आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive