By  
on  

दीपिका आणि रणवीर यांनी चार वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा

 दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलिवुडची बाजीराव-मस्तानीची जोडी यंदा विवाहबंधनात अडकली व आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या. लग्नानंतर या नवपरिणीत जोडप्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितलं होतं की, चार वर्षांपूर्वीच आम्ही साखरपुडा केला होता. पण आम्ही हे मुद्दाम लपवून ठेवले होते. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रणवीर दीपिका एकमेकांना डेट करत होते, तेव्हा सहा महिन्यांतच रणवीरला याची जाणीव झाली होती की, दीपिकाच त्याची सहचारिणी होऊ शकते. दीरिका म्हणाली, जेव्हा आम्ही यशराजच्या ऑफीसमध्ये काही कामानिमित्त भेटलो होतो, तेव्हा रणवीर माझ्यासोबत भान विसरुन फ्लर्ट करत होता. त्याला तिथे उपस्थित कोणाचीच पर्वा नव्हती.

या रामलीला जोडीला जेव्हा संजय लिला भन्साळी यांनी एकदा लंचसाठी बोलावलं होतं. जेवताना दीपिकाच्या दातात काही अडकलं होतं, हे रणवीरनं अचूक हेरलं आणि तिला सर्वांसमोर नजरेस आणून दिलं तेव्हा मग तिनेसुद्धा रणवीरला सांगितलं तुच काढून दे ना, हा लव्हस्टोरीच्या सुरुवातीचा किस्सा दीपिकानेच शेअर केला आहे.

सोसळ मिडीयावरसुद्धा या दीप-वीरचं प्रेम अजिबातच लपत नाही. नेहमीच एकमेकांची प्रशंसा करताना पाहायला मिळतात. नुकताच जेव्हा रणवीरला सर्वोत्कृष्ट म्हणून स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला तेव्हा या सोहळ्याला उपस्थित असलेल्या दीपिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Recommended

PeepingMoon Exclusive