By  
on  

राकेश रोशन यांना कॅन्सर, भावूक मेसेज पोस्ट करत ह्रतिकचा खुलासा

आजाराला ना श्रीमंत–गरिबाची मर्यादा असते ना सामान्य वा सेलिब्रिटींची. कारण कॅन्सरच्या बाबतीत असंच म्हणावं लागणार आहे. बॉलिवुडला सध्या कॅन्सरचं ग्रहण लागल्याचं दिसतंय, इरफान खान, सोनाली बेंद्रे,ऋषी कपूर यांच्यानंतर आता प्रसिध्द अभिनेते आणि निर्माते राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेचा घशाचा कॅन्सर झाल्याचं समजतय. याची माहिती खुद्द त्यांचा मुलगा आणि अभिनेता ह्रतिक रोशन याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत दिली.

ह्रतिकरोशनने इंस्टाग्रामवर म्हणतो, “आज सकाळी मी डॅड सोबत एक फोटो काढण्यासाठी विचारलं. सर्जरीच्या दिवशीही ते जीम कधीच टाळणार नाहीत याची खात्री होती. ते सर्वात कणखर व्यक्ती आहे. ते आमचे कुटुंबप्रमुख असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. लव्ह यू डॅड”

https://www.instagram.com/p/BsW-YxsnUtI/?utm_source=ig_embed

ह्रतिक रोशनची बहिण सुनैना रोशन हीसुध्दा यापूर्वी कॅन्सरपीडित होती. पण तिने या आजाराशी मोठ्या धैर्याने लढा दिला. आता वडिलांना कॅन्सरचे निदान झाले आहे.

'घर घर की कहानी' या सिनेमातून राकेश रोशन यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. राकेश रोशन यांनी आपल्या सदाबहार अभिनयाचा ठसा उमटवण्यासोबतच 'किशन कन्हैया', 'करण-अर्जुन', 'कहो ना .. प्यार है', 'कोई .. मिल गया', क्रिश आणि काबिल यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive