By  
on  

OMG! जान्हवीला फोटोग्राफर जेव्हा सारा म्हणून हाक मारतात तेव्हा....

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोन्ही स्टार किड्समध्ये नेहमीच स्पर्धा आणि तुलना केली जाते. कधी पदार्पणावरुन तर कधी अभिनयावरुन. तर कधी कोणाच्या पारड्यात किती सिनेमे पडलेत यावरुन त्यांच्या प्रसिध्दीचं मोजमाप केलं जातं. तर नुकतीच एक अशीही चर्चा रंगली होती, ती म्हणे जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी साराला मिळणारी अफाट प्रसिध्दी पाहता जान्हवीच्या पीआर टीमला खडे बोल सुनावले होते.

जान्हवीचा आत्तापर्यंत धडक हा एकच सिनेमा प्रदर्शित झाला आहे तर साराचे केदारनाथ आणि सिंबा हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. जान्हवीला धडकमुळे चांगली प्रसिध्दी मिळाली खरी पण तिच्यानंतर आलेल्या साराने आपल्या दोन्ही सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि एक प्रकारे मागून येऊन चाहत्यांच्या मनात विराजमान झाली.

आता सर्वांच्याच तोंडी फक्त सारा एके सारा हे नाव बसलंय.जिथे जाईल तिथे साराचीच चर्चा असते. आता त्याचं झालं असं की जान्हवी आणि तिची बहिण खुशी कपूर या दोघी नुकत्याच नेहा धूपियाच्या टॉक शोसाठी उपस्थित होत्या तिथे व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताच प्रसिध्दी माध्यमांनी तिला घेरलं. एका फोटोग्राफरने जाणीवपूर्वक जान्हवीला सारा सारा.. अशी हाक मारली आणि तीसुध्दा एकदा नाही तर अनेकवेळा. पण जान्हवी अजिबात डगमगली नाही, तिनेही त्यांना, “मुझे पता है आप जानबुझ के बोल रहे हो",असं तिने हसत हसत उत्तर दिलं.

https://www.instagram.com/p/Bs5Xaw7Dd9C/?utm_source=ig_embed

असो या दोघींमध्ये शीतयुध्द आहे की नाही, ते आता येणारा काळ ठरवेलच.

https://www.instagram.com/p/Bs5V8IQjO0G/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive