रणबीर आणि दीपिकाच्या एकत्र काम करण्याबद्दल रणवीर सिंह म्हणतो..

By  
on  

आता हे सर्वांनाच माहितीय की सहा वर्षापूर्वी दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरचं काय स्थान होतं. तिचं आरके टॅटूप्रकरण तुम्ही चांगलंच जाणता. पण हा झाला सर्व भूतकाळ. ब्रेकअपनंतर दीपिकाचं मूव्ह ऑन म्हणत सिनेमानिमित्ताने अभिनेता रणवीर सिंह सोबत सुत जुळलं आणि तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाच्या आणभाका घेतल्या आणि गेल्या वर्षी हे दोघं बोहल्यावरसुध्दा चढले. त्यामुळे आता रणबीर कपूर दीपिकाचा भूतकाळ आहे तर रणवीर सिंह हा वर्तमानकाळ.

दीपिका आणि रणबीरने नेहमीच आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल काम वेगवेगळं ठेवलं होतं. त्यामुळे ब्रेकअपनंतरसुध्दा दीपिका -रणबीर या जोडीने दोन सिनेमे केले. एक होता अयान मुखर्जीचा ये जवानी है दिवानी आणि दुसरा इम्तियाज अलीचा तमाशा. पण तुम्हाला काय सर्वांनाच हा प्रश्न नेहमीच पडला असेल सर्वसामान्य तरुणाप्रमाणे दीपिकाचा पती रणवीर सिंहला या दोघांच्या एकत्रित काम करण्यामुळे कुठेतरी असुरक्षिततेची भावना तर वाटली असेलच. हीच दुखरी नस पकडून नुकताच एका कार्यक्रमादरम्यान रणवीरला प्रश्न विचारण्यात आला.

ranbir

रणवीर सिंह या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतो, काय मी एखाद्या असुरक्षित इसमासारखा वाटतो का. मला माहितीय की माझं खासगी आयुष्य कसं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम दीपिकावर कोणीच करु शकत नाही. त्या दोघांनी एकत्र काम करण्यास माझी काहीच हरकत नाही, याऊलट मी रणबीर कपूरसोबत काम करण्यास खुप उत्सुक आहे.

Recommended

Loading...
Share