By  
on  

मीरा राजपूतचा पहिला टीव्ही परफॉर्मन्स; शाहिदसोबत या कार्यक्रमाची होणार परिक्षक

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे दोघंही नेहमीच चर्चेत असतात. मीरा कधी ट्रोल होते तर कधी तिच्या अ‍ॅड फिल्मच्या डेब्यूवरुन चर्चेचा विषय ठरते.  सोशल मिडीयावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असणा-या मीराच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत होत्या.याबाबत अजुन तरी निश्चित बातमी नाही. पण आता मीरा पती शाहिद कपूरसोबत लवकरच एक प्रसिध्द रिएलिटी शोच्या परिक्षकपदाची धुरा सांभाळणार असल्याचे समजते. यापूर्वी या शोसाठी अरबाज आणि मलायकाचं नाव घेतलं जात होतं.

एका प्रसिध्द वेबसाईटच्या माहितीनुसार, मीरा आणि शाहिद कपूर यांनी या शोसाठी होकार कळवल्याचं समजतंय. तसंच शोच्या टीमने यासंदर्भात शाहिद मीराची भेट घेतली असून शोच्या फॉरमॅटबद्दल चर्चासुध्दा केली आहे. सूत्रांनुसार या कार्यक्रमासाठी नोहा कक्कर, सुनील ग्रोवर, जेनिफर विंगेट ही नावं पण होती. परंतु शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे मोठं सेलिब्रिटी कपलचं या शोच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरुन प्रक्षकांसमोर येत आहे.

शाहिद कपूर सुपर डान्सर आहे. त्याने झलक दिख ला जा कार्यक्रमाचंसुध्दा परिश्क्षक पद भूषवलं होतं. तर  ‘नच बलिए 8’ च्या परिक्षकपदी सोनाक्षी सिन्हा, टेरेन्स लुईस आणि मोहित सुरी हे विराजमान होते. त्यामुळे आता नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive