By  
on  

सलमान खानला व्हायचंय 'बाप'माणूस! पण...

'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' यासारखंच 'सलमान खान लग्न कधी करणार?' हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' याचं उत्तर उलगडलं परंतु सलमान खानच्या लग्नासंबंधीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. सलमानच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांनी सलमान खान या जन्मात लग्न करेल ही आशा सोडली आहे.

सलमानला लहान मुलांची खूप आवड आहे, हा खुलासा सलमानची आई सलमा खान यांनी मध्यंतरी केला. बहीण अर्पिताच्या मुलाशी भाईजानचं छान बॉण्डिंग आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अशीही बातमी प्रसिद्ध झाली होती की, करण जोहर, शाहरुख खान आणि तुषार कपूर नंतर सरोगसीच्या माध्यमातून सलमानसुद्धा 'बाप'माणूस बनण्याच्या विचारात आहे.

एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने यासंबंधी म्हणाला,''मला लहान मुलं आयष्यात हवी आहेत. परंतु मुलं म्हटलं कि आईसुद्धा सोबत येते. ते मला नकोय'' यावरून असं दिसून येतं सलमानचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. ''पुढच्या काही दिवसात तरी लग्न करणार नाही'', असंही सलमान पुढे म्हणाला.

सध्या सलमान खान 'भारत' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर सलमान 'दबंग ३' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive