हम साथ साथ है सिनेमाच्या शूटींगदरम्यान 1998 साली झालेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही.ह्या सुनावणीसाठी बॉलिवूडचा दबंग सलमान खान शुक्रवारी २७ सपटेंबरला जोधपूरच्या कोर्टात हजर होणार होता. पण तत्पूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे.सोपू नावाच्या एका गॅंगने त्याला सोशल मिडीयावरुन धमकी दिली होती. ह्या गॅंगच्या शार्प शूटरने सलमानच्या फोटोवर लाल क्रॉस केला होता. याच कारणास्तव आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सलमान खान आज कोर्टात सुनावणीसाठी हजर होणार नाही.
आता ह्या सुरक्षेच्या कारणास्तव ही काळवीट शिकार प्रकरणाची पुढील सुनावणी आता डिसेंबर 19 रोजी होणार आहे. काळवीट शिकार प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या इतर कलाकारांविरोधात या महिन्याच्या सुरुवातीला राजस्थान सरकारने राजस्थान हायकोर्टात धाव घेतली होती. केवळ सलमान खान या प्रकरणात दोषी ठरला आहे.