पाहा Photo : 'देवी'मध्ये काजोलसह झळकतायत नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे

By  
on  

सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे घेऊन येण्याचं धाडस फिल्ममेकर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकसुध्दा तितकीच मनमुराद दाद देतात. नुकताच एक फोटो सोशल मिडीयवर व्हायरल  झाला आणि सर्वांनाच एक नवी कलाकृती पाहायला मिळणार याची चाहुल लागली. कारणही तसंच होतं. मराठी आणि बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्रींचा मेळ या फोटोत पाहायला मिळाला आणि एक वेगळीच उत्सुकता लागून राहिली. 

लवकरच  'देवी'  ही एक शॉर्ट फिल्म रसिकांच्या भेटीला येत आहे आणि यात चक्क सुपरस्टार काजोल भूमिका साकरतेय. फक्त काजोलच नाही तर तिच्यासोबत या फिल्ममध्ये श्रृती हसन, नेहा धुपिया, नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दयामा या एकून नऊ महिला प्रमुख भूमिका साकरतायत. नऊ अत्याचारग्रस्त महिलांच्या कथेभोवती ही शॉर्टफिल्म आकार घेईल. 

'देवी' या शॉर्ट फिल्मची एक रंजक गोष्ट अशी की, अवघ्या दोन दिवसांत याचं शूटींग पूर्ण करण्यात आलं. नवोदित लेखिका आणि दिग्दर्शिका प्रियांका बॅनर्जीने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलीय. 

सर्वांनाच या नऊ देवींचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share