By  
on  

लता दीदींचा बिट्टू झाला पाच वर्षांचा, पाहा Photo

हिंदी, मराठी यांच्यासह अनेक भाषांमध्ये भारतरत्न लतादीदींनी गाणी गायली आहेत. पण आता वाढत्या वयोमानानुसार त्यांनी रेकॉर्डींग जरा कमी केलं आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर या नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. नेहमीच त्या प्रत्येक घडामोडींवर आपलं मत व्यक्त करताना दिसतात. तसंच सिनेसृष्टीशी संबंधित किंवा राजकीय वर्तुळातील नामवंत व्यक्तींना त्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देतानासुध्दा पाहायला मिळतात. पण आज त्यांनी एका खास व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत. ते पाहून तुम्ही म्हणाल, वॉव.  

लता दीदींनी आपल्या लाडक्या बिट्टूला ट्विटरवरुन खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर त्याचे गोड फोटोसुध्दा त्यांनी यासोबत शेअर केले आहेत. 

लतादीदींनी आपला लाडका कुत्रा, बिट्टूचा फोटो ट्विटर अकाऊंटवर टाकत, त्याला पाचव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावरुनच त्यांचं प्राणीप्रेम दिसून आला. 

मध्यंतरी लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तरीही त्या त्यातून खंबीरपणे बाहेर आल्या आणि पूर्णपणे ठीक झाल्या 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive