By  
on  

लतादीदींनी केलं आयुषमानचं कौतुक, दीदींनी पाहिला आयुषमानचा हा सिनेमा 

हिंदी सिनेसृष्टीत सध्या आघाडीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी आयुषमान खुराना हा एक आहे. विविध विषयांचे सिनेमे निवडून आयुषमान प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. 2018मध्ये आलेल्या आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधून’ सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांच्या पसंतीची पावती या सिनेमाला मिळाली होती. मात्र अजूनही आयुषमानवर या सिनेमासाठी कौतुकांचा वर्षाव होत आहे. नुकतच भारताची गानकोकीळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आयुषमान खुरानाचं कौतुक केलं आहे. 

लतादीदींनी नुकताच आयुषमानचा हा ‘अंधाधून’ हा सिनेमा पाहिलाय. दीदींना हा सिनेमा इतका आवडला की त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या आयुषमानचं या सिनेमासाठी कौतुक केलं आहे. दीदींनी ट्विटरवर आयुषमानच्या कामाचं आणि त्याच्या गाण्यांचंही कौतुक केलं आहे. 

लतादीदींनी केलेल्या ट्विटवर आयुषमाननेही प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये आयुषमान म्हणतो की, “लतादीदी तुमचं हे असं म्हणणं माझ्यासाठी खुप महत्त्वाचं आहे. तुमच्या या प्रोत्साहनासाठीच कदाचीत मी एवढी मेहनत घेतली असेल. तुमच्या आशिर्वादासाठी धन्यवाद.”

‘अंधाधून’ या सिनेमासाठीच आयुषमानला 2019मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून या सिनेमाने 2019च्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली होती. 
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive