By  
on  

पाहा Video : “मी जिवंत आहे” असं बोलण्याची मुमताज यांच्यावर आली वेळ

सोशल मिडीयाचा चुकीचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मग यात एकादी अफवा पसरवण्याचही काम केलं जातं. नुकताच एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत होता. यात होती प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची बातमी. मात्र अशा पद्धतिचे मेसेज फॉर्वर्ड करताना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना ते सर्रासपणे फॉर्वर्ड केले जातात. मात्र या बातमीचा त्रास त्यांच्या कुटुंबियांना झाला. 

दरवर्षी विविध कलाकारांच्या निधनाच्या अफवा पसरत असतात. यात मुमताज यांचही नाव असतं. त्यांच्या निधनाची बातमी पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. आणि अशा वेळी भारातबाहेर असलेली त्यांची मुलगी तान्या यावर स्पष्टीकरण देत असते. याही वेळी तेच करण्यात आलं. मुमताज यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तरीही काही काहींनी या अफवा थांबवल्या नाहीत. मग काय मुमताज यांच्या मुलीने थेट एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत स्वत: मुमताज आहेत. आणि त्या स्वत: जीवंत असल्याचं या व्हिडीओत सांगत आहेत. त्या या व्हिडीओमध्ये म्हणतात की, “माझ्या चाहत्यांना माझं प्रेम. बघा माझं निधन नाही झालय. मी जिवंत आहे. आणि काही म्हणतात तशी म्हातारी पण दिसत नाही. अजूनही प्रेझेंटेबल दिसत आहे.”

हा व्हिडीओ करून मुमताज यांनी त्यांच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम दिला आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive