By  
on  

रक्षाबंधनाच्या निमित्ताने लतादीदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास संदेश

आज सगळीकडे रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही घरात राहूनच काही जण हा सण साजरा करत आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या ज्यांना भावाच्या स्थानी मानतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लतादीदींनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदींना राखी पाठवली आहे.

 

लतादीदी या व्हिडीओत म्हणतात की, "नरेंद्र भाई, आज रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी मी तुम्हाला प्रणाम करते, राखी तर मी पाठवू शकत नाही आणि त्याचं कारण पूर्ण जगाला माहिती आहे. तुम्ही देशासाठी इतकी कामं केली आणि इतकं छान बोलले आहात जे देशातील लोकं विसरू नाही शकत. आज भारतातील लाखो, करोडो महिला तुम्हाला राखी बांधण्यासाठी त्यांचे हात पुढे आहेत पण राखी बांधणं सध्या अशक्य आहे. राखीच्या दिवशी मला वचन द्या की तुम्ही भारताला अजून पुढे घेऊन जाल."

 

लतादीदींचा हा संदेश पाहून नरेंद्र मोदी यांनीही  या खास शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive