काजोल मिस करतेय ही गोष्ट, 'त्रिभंगा' सिनेमातील कलाकारांसोबतचा फोटो केला पोस्ट

By  
on  

अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंगा' या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका आहे. शिवाय अभिनेत्री मिथिला पालकर आणि वैभव तत्त्ववादी हे कलाकारही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

'त्रिभंगा' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतच काजोलने या सिनेमाविषयीची आठवण शेयर केली आहे. या सिनेमाच्या टीमसोबतचा फोटो काजोलने पोस्ट केला आहे. या फोटोत काजोलसह रेणुका शहाणे, वैभव तत्त्ववादी, मिथिला पालकर आणि इतर टीम पाहायला मिळतेय.

काजोल या पोस्टमध्ये लिहीते की, "आपण असं पुन्हा भेटू शकतो का ?" 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Can we catch up again like this?! #TribhangaTales

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

 

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे एकत्र भेटणं कमी झाल्याने काजोलने ही पोस्ट केली असल्याचं चित्र पाहायला मिळतय. 

Recommended

Loading...
Share