By  
on  

यो यो हनी सिंहने सांगीतला त्याचा डिप्रेशनसोबतचा संघर्ष, कठीण प्रसंगी दीपिका आणि शाहरुख खानने केली होती मदत

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंह नुकतच त्याच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगाविषयी खुलुन बोलला आहे. सोबतच हनी सिंहने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचे डिप्रेशन आणि बाईपोलर डिसऑर्डरच्या विरोधातल्या त्याच्या संघर्षात मदत करण्यासाठी धन्यवाद मानले आहेत. रिजेक्शन, डिप्रेशन, बाईपोलर याविषयी बोलताना हनी सिहंने हे देखील सांगीतलं की त्याला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि कसा तो बाईपोलर डिसऑर्डरसोबतच्या लढ्यानंतर त्या आजारावर मात करण्यावर यशस्वी झाला. याशिवाय आणखी बऱ्याच आजारांपासून तो त्रस्त होता. पण त्याने धैर्य आणि संयमाच्या जोरावर या आजारांवर मात करत पुन्हा जोरदार कमबॅक केला. 

एका प्रसिद्ध वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंहने खुलासा केला आहे की त्याला हे तो आजारी असल्याचं स्विकार करण्यासाठी 3 ते 4 महिने लागले. यानंतर हनीची रात्रीची झोप उडाली होती. या वेबसाईटशी बोलताना यो यो हनी सिंह म्हटला की नशेची लत लागल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आणि त्यावेळी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण ते व्यक्ति होते ज्यांनी त्याचं डिप्रेशन आणि बाईपोलर डिसऑर्डर विरोधात संघर्षात मदत केली होती.शिवाय हनी सिंह म्हणतो की, “तो माझ्यासाठी कठीण काळ होता. माझ्या मानसिक संतुलनात कमी होती. मी दारू प्यायला सुरुवात केली होती. मी झोपणं सोडून दिलं होतं. अशाप्रकारे हा आजार हळुहळु वाढत गेला. मला हे स्विकारण्यासाठी 3-4 महिने लागले. हा एक वाईट काळ असतो. आणि हे आपण लपवलं नाही पाहिजे. जेव्हा आपण आपल्या प्रत्येक गोष्टी चाहत्यांसोबत शेयर करतो तर आपल्याला हे देखील लपवलं नाही पाहिजे.”


हनी सिंह पुढे म्हणतो की “मला स्वत:लाही हे स्विकारायला वेळ लागला की मी आजारी आहे. माझी रात्रीची झोप मोडली होती. अशावेळी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणने मला फक्त समजावलं नाही तर नशा आणि डिप्रेशन विरोधात माझ्या पाठीशी उभे राहिले. दोघांनीही मला डॉक्टरांचे नंबर देण्यापासून ते मला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यास मदत केली.”
“दीपिका सुद्धा यातून गेली हे. तिने मला दिल्लीतील एका डॉक्टरचा नंबर दिला. सगळ्यांनी मी निट होण्यासाठी प्रार्थना केली. एक कलाकार प्रेक्षकांसाठी आरश्यासारखा असतो. तर तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी का शेयर करू शकत नाही.” असंही हनी सिंह म्हटला.
 
 
 
 2020 मध्ये हनी सिंहचे चार सिंगल साँग रिलीज झाले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive