एखाद्या मालिकेत प्रमुख पात्राची भूमिका साकारणं आणि ते मिळणं हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचं असतं. मग ती मालिका जर प्रचंड लोकप्रिय होते तर त्याचा फायदा त्या कलाकारांनीही होतो. त्यांचीही लोकप्रियता वाढते. अर्थात त्यांच्या कामामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढलेला असतो. अशीच एक लोकप्रिय मालिका आहे ती म्हणजे मुलगी झाली हो. या मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांना भावला. माऊ, शौनक, विलास पाटील ही सगळीच पात्र प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटू लागली आहेत.
या मालिकेत शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहोनी बऱ्याच वर्षांनी पुन्हा मालिका विश्वात झळकतोय. मात्र या पात्रासाठी त्याने जवळपास तीन ते सव्वा तीन वर्षे वाट पाहिली असल्याचं त्याने नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतलय. योगेशहा 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतही झळकला होता. या मालिकेनंतर लीड भूमिका मिळावी यासाठी त्याने तब्बल सव्वा तीन वर्षे वाट पाहिली. जेव्हा 'मुलगी झाली हो' या मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा योगेशने लगेचच ऑडिशन दिलं. 2019 रोजी योगेशचं या मालिकेसाठी ऑडिशन करण्यात आलं होतं, जे चार टप्प्यात झालं होतं.
योगेश म्हणतो की, "जेव्हा तुम्ही लीड करत असता तेव्हा तुमच्यावर खूप जबाबदारी असते. जेव्हा माझ्याके हे काम आलं तेव्हा माझी ऑडिशन ही चार टप्प्यामध्ये झाली. अस्मिता ही मालिका केल्यानंतर सव्वा तीन वर्षे मी काहीच केलं नाही. मी लीडसाठी थांबलो होतो. ते टिकवून ठेवण्याची माझी तयारी होती. "
या दरम्यान योगेश हा चित्रपटांमध्ये विविध भूमिका, निवेदन या गोष्टी करत होता. याशिवाय मालिकांसाठीही विचारणा होता होती पण काही जुळून येत नसल्याचं योगेशने सांगीतलं. पात्र आणि आर्थिक गणितं जुळत नसल्याने ती पात्र स्विकारता आली नसल्याचं तो म्हटलाय. योगेश म्हटतो की "या दरम्यान मला आई-वडिलांचा मानसिक आधार मिळाला होता. मला लवकरच संधी मिळेल याचा विश्वास त्यांना होता."
'मुलगी झाली हो' या मालिकेतील शौनक या पात्रामुळे योगेशचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या चाहत्यांमध्ये त्याची शौनक म्हणूनही ओळख आहे. याशिवाय आगामी काळात निर्मिती क्षेत्रात काम करण्याची इच्छा योगेशने सांगीतली. लवकरच वेबसिरीजच्या निर्मितीत उतरण्याचं त्याचं लक्ष्य असल्याचं योगेश म्हणतो.