मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून मिळालेल्या निवांत वेळेत हे कलाकार विविध गोष्टी करताना दिसत आहेत. या मालिकेत शौनकच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता योगेश सोहोनीला गायनाची आवड आहे. म्हणूनच सध्या सेटवर निवांत वेळेत तो गाण्याचे धडे घेतोय.
अभिनेते अजय पुरकर हे या मालिकेत राजन मामाची भूमिका साकारत आहेत. अजय हे उत्तम गायकही आहेत. तेव्हा सेटवर या गायकाकडून गाणं शिकण्याचा मोह योगेशला आवरला नाही. त्याने मग सेटवरच अजय पुरकर यांच्याकडून गाण्याचे धडे घेतले आहेत. योगेशने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.
चित्रीकरणापासून सुट्टी मिळाल्यावर त्याने अजय यांच्यासोबत बसून गाण्यांची जणू मैफलच रंगवली आहे. योगेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "शूटिंगला सुट्टी मिळाल्यावर राजन मामा (अजय पुरकर) शौनकला (योगेश सोहोनी) गाण्याचे धडे देतो. आता जेव्हा घड्याळात वाजणार नऊ तेव्हा परत येणार तुमची माऊ..."