पाहा Video : वाढदिवसाला माऊला शौनककडून मिळालं हे खास गिफ्ट

By  
on  

'मुलगी झाली हो' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसतेय. या मालिकेत विविध पात्र साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनलेत. म्हणूनच सोशल मिडीयावरही या कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. याच मालिकेत माऊ साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाषचाही सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने आज तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माऊ म्हणजेच साजिरीची भूमिका साकारणाऱ्या दिव्याचा वाढदिवस नुकताच 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेतील सहकलाकार आणि तंत्रज्ञ टीमसोबत दिव्याने केक कापून वाढदिवस साजरा केला.

 

एवढच नाही तर माऊला तिच्या सहकलाकारांकडून खास शुभेच्छा आणि भेटवस्तू मिळाल्या आहेत. यात सिद्धांत भोसलेची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ खिरीडने सोशल मिडीयावर माऊसोबतचा फोटो शेयर केला आहे. तर शौनकची भूमिका साकारणार अभिनेता योगशे सोहोनीने माऊचं व्यंगचित्र असलेली फोटोफ्रेम तिला भेट दिली आहे. माऊ साकारणाऱ्या दिव्यासोबतचा फोटो शेयर करत त्याने सोशल मिडीयावरही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

योगेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "माऊ - आज माझा "बर्थ डे" आहे तर मला काय गिफ्ट देणार ? शौनक - अगं हे काय ही फोटोफ्रेम दिली ना तुझं व्यंगचित्र असलेली. माऊ - नाही अजून काहीतरी, माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोल. शौनक - मी तुझा लिओ आणि तू माझी केट कोणी कितीही आडवं आलं तरी सिरीयल मध्ये आपलच लग्न होणार थेट. माऊ - Awwwww"

Recommended

Loading...
Share