By  
on  

पाहा Video : 'मुलगी झाली हो'च्या सेटवर चक्क शौनकने केला माऊचा मेकअप

'मुलगी झाली हो' ही मालिका आता वेगळ्या वळणावर प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसतेय. एकीकडे आपल्या मुलीचा द्वेष करणारा विलास पाटील आता मुलीसाठी काहीही करण्यासाठी तयार झालाय. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना आवडल्याचं पाहायला मिळतय.

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. यातच मुलगी झाली हो या मालिकेची टीमही महाराष्ट्राबाहेर या मालिकेचं चित्रीकरण करत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या गुजरातमधील नवसारी येथे होत आहे. आउटडोअर शूट म्हटल्यावर शूटिंग दरम्यान मजा मस्ती ही होणारच ना. तर मग या मालिकेच्या सेटवरही असच काहीसं पाहायला मिळतय. कारण या मालिकेच्या सेटवर चक्क शौनकने माऊचा मेकअप करुन दिलाय. सेटवर शूटिंग दरम्यान शौनक मेकअप करुन तयार झाला मात्र माऊला तयार व्हायला वेळ लागत होता. मग काय शौनकने मेकअपचं साहित्य हाती घेतलं आणि तो माऊचा मेकअप करु लागला. हा मजेशीर व्हिडीओ शौनक म्हणजेच ही भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहोनीने शेयर केला आहे.

 

या मालिकेत माऊच्या स्वभावाने तिच्या प्रेमाने विलास पाटलांचं मतपरिवर्तन झाल्याचं दिसतय. यातच मालिकेत आता माऊ आणि एसीपी सिद्धांत यांची जवळीक वाढताना दिसत आहे. हे पाहुन शौनकला मात्र त्रास होतोय. शौनकचा साखरपुडा हा दिव्यासोबत होणार आहे. तरीही शौनक मात्र माऊच्याच आठवणीत असल्याचं पाहायला मिळतय. तेव्हा सिद्धांत, शौनक आणि माऊ या प्रेमाच्या त्रिकुटात माऊसोबत कुणाचं प्रेम टीकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive