By  
on  

पाहा Video : साखरपुड्याच्या दिवशी शौनकसोबत घडली ही घटना

'मुलगी झाली हो' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवे ट्विस्टसह ही मालिका वेगळं वळण घेताना दिसतेय. त्यातच शौनक आणि दिव्याचा साखरपुडा या मालिकेत लक्षवेधी ठरणार आहे. या साखरपुडा सोहळ्यात असं काही घडणार आहे ज्याने सगळ्यांनाच धक्का बसणार आहे.

या साखरपुडा सोहळ्याआधी शौनक माऊची भेट घेतो. दिव्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवु शकत नसल्याचं शौनक यावेळी माऊला सांगतो आणि तिथून निघून जातो. जेव्हा शौनक जिन्यांवरुन खाली उतरतो त्यावेळी अचानक त्याचा तोल जातो आणि शौनक जिन्यांवरून खाली कोसळतो. हे दिसताच सगळे तिथे धावून येतात. 

 

आता या अपघातातून शौनकची काय अवस्था झाली असेल ? या अपघातामुळे शौनकचा दिव्यासोबतचा साखरपुडा मोडेल का ? माऊ आणि शौनक पुन्हा एकत्र येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही मालिका सध्या रंजक वळणावर असतात मालिकेत आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार एवढं नक्की. या मालिकेत शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहोनीने हा नवा प्रोमो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "माऊच्या पुन्हा एकदा प्रेमात पडता-पडता, जिन्यावरूनच पडलो". अशी गमतीशीर पोस्ट शौनक उर्फ योगेशने केली आहे. 

या मालिकेत आता पुढे काय घडणार हे आगामी भागांमधून पाहायला मिळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive