पाहा Video : गौरीला मोलकरीणची वागणूक दिल्यावर जयदीप असा संतापला

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता जयदीपने संपूर्ण परवारासमोर गौरीसोबत लग्न केलं आहे. दादासाहेबांची प्रकृती निट व्हावी यासाठी जयदीपने हा मार्ग अवलंबला आहे. मात्र आता गौरी जयदीपची पत्नि झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

नेहमीप्रमाणे देवकी गौरीवर कामासाठी आरडाओरड करत आहे. मात्र जेव्हा हे जयदीपच्या निदर्शनास येतं तेव्हा तो देवकीला थांबवतो. गौरी आता मोलकरीण नसून त्याची बायको असल्याचा उल्लेख तो यावेळी करतो आणि गौरीला तिथून घेऊन जातो. हे पाहुन देवकी देखील थक्क होते.

 

जयदीपसोबत लग्न झाल्यानंतर गौरीचं आयुष्य आता बदलेलं पाहायला मिळतय. असं असलं तरी माई अजून गौरीवर नाराज आहेत. या सगळ्यात गौरीच्या आयुष्यात आणखी काय घडामोडी घडतात आणि त्यात जयदीप तिला साथ देतो का हे पाहणं या मालिकेत रंजक ठरणार आहे.

Recommended

Loading...
Share