पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत कीर्तीचा नव्या कुटुंबात असा साजरा होत आहे दिवाळसण

By  
on  

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता कीर्ती लग्नानंतर नव्या कुटुंबात हळूहळू रमताना दिसत आहे. भावाने जबरदस्ती लावून दिलेलं लग्न आणि त्यात आयपीएस होण्याची स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीचं आयुष्य लग्नानंतर बदललं आहे. एका अपघातात आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या किर्तीला तिच्या कुटुंबाची आठवणही या सगळ्यात येत असते.

नुकतीच कीर्ती लग्नानंतर या नव्या कुटुंबात दिवाळी साजरी करत आहे. यात कीर्तीला आई-वडिलांचीही आठवण येत आहे. मात्र कीर्तीच्या सासूबाई तिचा हा दिवाळसण खास करतात. लग्नानंतरचा कीर्तीचा हा पहिला दिवाळसण असल्याने तिला सासूबाई उटणे लावतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

कीर्ती आता या नव्या कुटुंबात रमतेय. एकीकडे स्वयंपाक घराच्या गोष्टीही पति शुभमच्या मदतीने शिकतेय. या सगळ्यात तिला शुभमची मिळालेली साथ मौलाची आहे. मात्र कीर्तीची उच्च शिक्षण घेण्याची आणि आयपीएस होण्याची स्वप्न या कुटुंबाला कळतील का ? ते समजल्यावर पुढे काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share