By  
on  

पाहा Video : सासू - सूनेच्या नात्यावर नवी मालिका, पुष्कर श्रोत्री करणार सुत्रसंचालन

सध्या टेलिव्हिजनवर विविध प्रकारचे कार्यक्रम मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत. ज्यात सासू-सूनेच्या नात्यातील नोकझोक असलेल्या मालिकाही पाहायला मिळतात. मात्र खऱ्या आयुष्यातही हे नातं असचं असतं का  ? तर याचं उत्तर पाहायला मिळणार आहे एका नव्या मालिकेत.

'सून सासू सून' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने रियल लाईफ सासू-सूनच्या जोड्या पाहायला मिळतील. तेव्हा खऱ्या आयुष्यात सासू-सूनेच्या आयुष्यात एखाद्या मालिकेसारखाच ड्रामा असतो का ? हे देखील पाहायला मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांचे, पुरस्कारांचे सुत्रसंचालन करणारा प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. तेव्हा सासू-सूनेच्या नात्यातील खरी गंमत या कार्यक्रमातून अनुभवता येणार एवढं नक्की. नुकतच या नव्या मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं गेलय की, "घरोघरी जाऊन,सासू सुनेचं गंमतीशीर नातं घेऊ समजून...नवी मालिका 'सून सासू सून'"

नवीन वर्षात येत्या 11 जानेवारीपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive