पाहा Video : ज्योतिबा साकारणारा अभिनेता विशाल निकम मालिकेच्या सेटवरच करतो वर्कआउट

By  
on  

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी विशालला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. या भूमिकेसाठी विशालने त्याचं वजन वाढवलं आणि वर्कआउट करुन तशी शरीरयष्टीही बनवली. 

मात्र एवढ्यावरच विशाल थांबला नाही तर मालिकेच्या सेटवरही तो वर्कआउट करत असतो. या लुकमध्ये फीट राहण्यासाठी विशाल सेटवर वर्कआउट करताना दिसतो. विशालने नुकताच त्याचा 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या सेटवर वर्कआउट करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे.

 

या पोस्टमध्ये विशाल लिहीतो की, "ज्योतिबा एकच सांगतो, ज्याची जेवढी ताकद तेवढच वजं उचलाव. अन जर का जास्ती वजं उचलायच असल, तर अंगमेहनत करून ती ताकद कमवायची."

जीम ट्रेनर ते अभिनेता असा विशालचा प्रवास आहे. त्यामुळे विशाला आधीपासूनच फिटनेस फ्रिक असल्याने या भूमिकेसाठीही तो तितकीच फिटनेसची काळजी घेताना दिसतोय. 

Recommended

Loading...
Share