By  
on  

पाहा Video : 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर पूजा आणि धर्मेशची ऑफस्क्रिन मस्ती

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स रिएलिटी शोच्या मंचावर एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. अभिनेत्री पूजा सावंत आणि प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर धर्मेश या कार्यक्रमाचे परिक्षक आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक डान्स परफॉर्मन्स निरखून पाहणारे आणि त्यावर योग्य ती प्रतिक्रिया देणारे हे परिक्षक ऑफस्क्रिन मस्ती करतानाही दिसतात.

पूजा सावंतने या कार्यक्रमाच्या सेटवरील ऑफस्क्रिन व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत पूजा आणि धर्मेशची ऑफस्क्रिन मस्ती पाहायला मिळतेय. ब्रेकटाईममध्ये या परिक्षक जोडीची चांगली बॉंडिंग पाहायला मिळतेय.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूजा आणि धर्मेशमध्ये चांगलीच मैत्री झाल्याचं पाहायला मिळतय. याशिवाय पूजा धर्मेशला या  व्हिडीओत मराठीतून बोलण्याचा आग्रह करताना दिसतेय. पूजाच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. पूजा ही उत्तम नृत्यांगना असून तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये, पुरस्कार सोहळ्यात सुंदर नृत्य सादर केले आहेत. तर धर्मेश हा अनेक डान्स रिएलिटी शोचा भाग झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूजा पहिल्यांदाच परिक्षक बनली आहे. तर धर्मेशने याआधी हिंदी डान्स शोचं परिक्षण केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive