चला हवा येऊ द्या या विनोदवीरांच्या मंचावर आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहेत. मालिका, नाटक, सिनेमांमधील अभिनेते, गायक, दिग्दर्शक, लेखक अशा अनेकांनी या मंचावर हजेरी लावली आहे. एवढच काय तर हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीज देखील या मंचावर येऊन गेलेत. या कार्यक्रमातील विनोदवीरांना आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
नुकताच या कार्यक्रमाचा एक स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला. या खास भागासाठी काही एव्हरग्रीन सिनियर अनुभवी कलाकारांनी हजेरी लावली होती. या खास भागासाठी अभिनेते अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे कलाकार उपस्थित होते. हे कलाकार या खास भागातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे अनुभव शेयर करणार आहेत.
यापैकी काही कलाकार याआधीही चला हवा येऊ द्याच्या मंचावर येऊन गेले आहेत. मात्र या सिनियर स्पेशल भागात या कलाकारांच्या आठवणी ऐकणं फार रंजक ठरेल. मात्र विनोदवीर या कलाकारांसमोर काय सादर करतील हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.
या कार्यक्रमाचे एव्हरग्रीन सिनियर्सचे हे खास भाग येत्या 11 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत.