By  
on  

पाहा Video : रविवारी सुद्धा मनोरंजनाचा धमाका, 31 जानेवारीला पाहायला मिळणार आवडत्या मालिका

यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण आठवडाभर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आवडत्या मालिका आता चक्क रविवारी पाहायला मिळणार आहे. येत्या 31 जानेवारी रोजी प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवरील त्यांच्या आवडत्या मालिका पाहायला मिळणार आहेत. 

 

31 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून या मालिकांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. यात 'चंद्र आहे साक्षिला', 'जीव झाला येडापिसा', 'राजा राणीची गं जोडी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'जय जय स्वामी समर्थ', 'शुभमंगल ऑनलाईन', 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकांचा समावेश असेल. 

विकडेजला दिसणाऱ्या मालिकांच्या एन्टरटेन्मेंटचा डोस यंदा प्रेक्षकांना चक्क रविवारी सलग अनुभवता येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive