'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता दीपा आणि सौंदर्यामध्ये सारं काही आलबेल होईल अपेक्षा असतानाच पुन्हा असं काही घडतं की सौंदर्या दीपाचा द्वेष करू लागते. दीपाच्या सावळ्या रंगामुळे द्वेष करणारी तिची सासू सौंदर्या आता पुन्हा दीपाच्या सावळ्या रंगाला दोष देताना दिसतय. दीपाची बहीण श्वेता जी सौंदर्याची छोटी सूनबाई आहे, तिचं बाळ गेल्यानंतर त्याचा दोषही सौंदर्या दीपाच्या सावळ्या रंगाला देते.
प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर दीपावर फोडणारी सौंदर्या पुन्हा दीपाचा द्वेष करू लागली आहे. मात्र आपल्या बहीणीची अवस्था पाहुन दीपा तिच्याजवळ जाते, तेव्हा सौंदर्या तिला थांबवते आणि तिला दोष देते. कार्तिक जेव्हा हे पाहतो तेव्हा त्याला प्रचंड राग येतो. आपल्या पत्नीला तिच्या रंगावरुन सतत हिणवणारी आपल्या आईचा तो विरोध करतो. दीपाला त्रास दिल्यावर आपल्या आईचीच तक्रार करेल असही तो सौंदर्याला सुनावतो. हे ऐकून सौंदर्याला धक्का बसतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये हे दाखवण्यात आलय. मात्र कार्तिक या वागण्याने सौंदर्या काय पाऊल उचलेल ? किंवा कार्तिक आपल्या पत्नीसाठी आता पुढे काय करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या रंजक वळणावर असलेली ही मालिका आता काय वळण घेते हे लवकरच पाहायला मिळेल.