सादर होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचा 100 वा भाग

By  
on  

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मालिकेला मिळत आहे. ज्योतिबाची गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता ही मालिका 100 भागांचा टप्पा पार करत आहे. या मालिकेचा 100 वा भागही आज प्रसारित होणार आहे. 

नुकतच स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये लिहीलय की, "आज सादर होत आहे 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचा १०० वा एपिसोड.. आपण या १०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तेव्हा या मालिकेच्या 100 व्या भागात काय पाहायला मिळेल याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली असेल. यासाठी खास प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share