By  
on  

पाहा Photos : यश आणि अभिषेककडून आईला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेतील आई जशी मालिकेतील इतर पात्रांची आवडती आहे तशीच ती प्रेक्षकांचीही आवडती बनली आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरला या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. या मालिकेसह प्रेक्षक मधुराणीच्या कामावरही प्रेम करतात. याच मधुराणीच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

मधुराणीला चाहत्यांसह अनेक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात मग तिचे मालिकेतील सहकलाकारही कसे मागे राहतील.

 

या मालिकेत आईची मुलं यश आणि अभिषेक अर्थात ही भूमिका साकारणारे निरंजन कुलकर्णी आणि अभिषेक देशमुख या कलाकारांनी मधुराणीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. मधुराणीसोबतचे काही खास फोटो शेयर करत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive