By  
on  

पाहा Video : 'नवे लक्ष्य'च्या प्रोमोमध्ये डॅशिंग अंदाजात दिसला आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून ओळख असलेले अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहमदेखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय. 'नवे लक्ष्य' या मालिकेतून सोहम अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतोय. या मालिकेतून पोलिसांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सोहमही पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. 

या मालिकेचे विविध प्रोमो सध्या प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राचे विविध प्रोमो प्रदर्शित होत आहेत. त्यातच सोहम झळकत असलेला प्रोमोही प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सोहमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध मालिकांच्या निमित्ताने कॅमेऱ्यामागची धुरा सांभाळत असलेला सोहम आता कॅमेऱ्यासमोर दिसणार आहे. 

 

नुकतच सोहमने सोशल मिडीयावर पोस्ट करून त्याच्या पहिल्या प्रोमोची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेयर केली. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive