By  
on  

पाहा Video : शुभमने उचललं टोकाचं पाऊल, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचा महाएपिसोड

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. लग्नानंतर शुभम आणि किर्तीचं नातं फुलत होतं. मात्र घारत शुभमची आई जीजी अक्काचा दरारा आहे. जीजी अक्काच्या वागण्यामुळे किर्तीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र यात तिला शुभमची साथ होती. अचानक शुभमने किर्तीची साथ सोडल्याचं पाहायला मिळतय. शुभम किर्तीसोबत विचित्र वागू लागलाय. याचं कारण आहे घटस्फोटाची कागदपत्रे. 

शुभमने किर्तीच्या खोलीत घटस्फोटाची कागदपत्रे पाहिल्यापासून तो किर्तीसोबत नीट वागत नाहीय. मात्र किर्ती शुभमला घटस्फोट देणार नाही असं ठरवते. या सगळ्यात शुभम संपूर्ण परिवारासमोर किर्तीला वाईट साईट बोलतो. दुखावलेली किर्ती रडू लागते आणि शुभमचे वडील भाऊ तिची समजूत काढतात. लवकरच या मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. शुभम असा का वागतोय त्याचं उत्तर किर्तीला मिळणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

शुभमला घटस्फोटाच्या कागदपत्राविषयी कळलय हे समजताच किर्ती घराबाहेर जायचा विचार करते मात्र शुभम स्वत:च तिला घराबाहेर काढताना दिसतोय. तेव्हा किर्ती घराबाहेर जाईल का ? काय असेल किर्ती आणि शुभमचं पुढचं पाऊल हे लवकरच या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive