लहानपणी स्विटू दिसायची अशी, लहानपणी आवडायचा हा पदार्थ

By  
on  

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत स्विटू आणि ओमची प्रेमकहाणी आता सुरु होताना दिसत आहे. त्यातच स्विटूचा क्यूटनेस अनेकांना आवडतोय. पण हीच स्विटू लहानपणी कसी दिसायची हे आता समोर आलय. 

अभिनेत्री अन्विता फलटणकर या मालिकेत स्विटूच्या भूमिकेत दिसतेय. स्विटू म्हणून तिला चाहत्यांचं भरपुर प्रेम मिळतय. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.  याच चाहत्यांसाठी तिने एक खास पोस्ट केली आहे. अन्विताने तिचा लहानपणीचा फोटो शेयर केला आहे. या फोटोत अन्विता अगदी 'स्विटू' दिसतेय असं म्हणायला हरकत नाही.

 

या फोटोसोबतच तिने एक खास गोष्ट शेयर केली आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "मशरुम फेस असलेलं हे लहान मुल, जिला जगाची काहीच पर्वा नव्हती आणि एक गोष्ट तिला माहिती होती ती म्हणजे तिला हक्का नूडल्स आवडतात."

तर स्विटू म्हणजेच अन्विताला लहानपणी हक्का नूडल्स आवडायचे हे तिने सांगीतलं आहे. तेव्हा ही स्विटू लहानपणी किती निरागस आणि गोड होती हे या पोस्टमधून पाहायला मिळतय. 

Recommended

Loading...
Share