पाहा Video : जयदीप - गौरीचा रोमँटिक डान्स, अवॉर्ड सोहळ्याच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ आला समोर

By  
on  

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहवरील अनेक मालिकांमधील प्रसिद्ध जोड्यांनी परफॉर्मन्स सादर केले. यात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील गौरी-जयदीपची जोडी देखील होती. दोघांनी यावेळी मंचावर रोमँटिक डान्स सादर केला होता. 

 

या परफॉर्मन्ससाठी गौरी आणि जयदीप म्हणजेच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधवने चांगलीच तयारी केली होती. रिहर्सल दरम्यानही दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. नुकतच गिरीजाने या रिहर्सल दरम्यानचा व्हिडीओ शेयर केला आहे. पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दोघांनी जसं परफॉर्म केलं तसच रिहर्सलमध्येही रोमँटिक अंदाज दिसला.

गौरी-जयदीपच्या चाहत्यांना त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स पुन्हा पाहण्याची इच्छा होती. म्हणूनच गिरीजाने रिहर्सलचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर केला.

Recommended

Loading...
Share