By  
on  

पाहा Video : पाककला स्पर्धेच्या निमित्ताने शुभम आणि कीर्तीच्या नात्यात दरवळणार प्रेमाचा सुगंध

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता शुभम आणि कीर्तीचं नातं खुलताना दिसत आहे. एकिकडे जीजी अक्कांच्या मनात कीर्तीविषयी आपुलकी निर्माण झाली आहे तर दुसरीकडे कीर्तीने घरातील सगळ्यांची मनं जिंकली आहेत. 

नुकतच कीर्तीने सोनालीचं सत्य सगळ्यांसमोर आणलय. सोनालीने जीजी अक्कांविरोधात पोलीसात खोटी तक्रार केल्याचे पुरावे गोळा करुन सोनालीचं सत्त कीर्तीने उघड पाडलं. असं असलं तरी कीर्तीमुळे जीजी अक्कांनी सोनालीला घराबाहेर काठलं नाही. मात्र सोनाली प्रेग्नेंट असल्याने कीर्ती आता तिची काळजी देखील घेत आहे. हे सगळं होत असताना आता शुभम आणि कीर्तीच्या नात्यातली जवळीक वाढताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आता एका पाककला स्पर्धेच्या निमित्ताने दोघाचं नातं अजून खुलत जाणार आहे. कीर्तीच्या प्रोत्साहनामुळे शुभम या पाककला स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो. आता याच स्पर्धेच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढताना दिसत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शुभम आणि कीर्तीच्या नात्यात प्रेमाचा सुगंध दरवळताना दिसतोय. आता हे नातं कस फुलत जातय हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

 सध्या मालिका वेगळ्या वळणावर असून मालिकेतील पात्र घरापासून दूर एका वेगळ्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मालिकेचा नवा ट्रॅक पाहायला मिळतोय. यातील ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहेत एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive