यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देश संकटात सापडलाय. अशात कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा त्याचा फटका मनोरंजन विश्वाला बसलाय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहेत. यात काही मालिकांचे जुने भागच पाहायला मिळत होते.
लोकप्रिय ठरलेल्या 'श्रीमंताघरची सून' या मालिकेचे मात्र आता नवे भाग लवकरच पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत अथर्व आणि अनन्याची प्रेम कहाणी पाहायला मिळाली होती. या मालिकेत आता पुढे काय घडतय हे लवकरच नव्या भागांमधून पाहायला मिळणार आहे. येत्या 17 मे पासून या मालिकेचे नवे भाग सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत.
या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, यशोमान आपटे, रुपल नंद या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही रियर लाईफ जोडी पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने रिल लाईफमध्ये एकत्र दिसतेय.