By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील या परफॉरमन्सनी वेधलं लक्ष

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अभिषेकच्या साखरपुड्याचा सोहळा पाहायला मिळतोय. या साखरपुड्याच्या सोहळ्याचे खास भाग या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अभिषेकच्या साखरपुड्यात देशमुख कुटुंबातील सगळ्या मंडळींनी खास डान्स परफॉर्मन्स केले आहेत. यात अनेक परफॉर्मन्स लक्षवेधी ठरले.

ईशा, यश आणि गौरी या तिघांनी मिळून खास परफॉर्मन्स दिला. यशने या कार्यक्रम सोहळ्याचं धमाल सूत्रसंचालन केलं. मग हळूहळू हा सोहळा रंजक होत गेला. जेव्हा अनिरुद्ध आणि संजना मंचावर एकत्र थिरकले तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या सोहळ्यातील या डान्स परफॉर्मन्सनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तर अनिरुद्ध आणि अरुंधती यांनीही आपल्या मुलांसाठी एकत्र येऊन खास परफॉर्मन्स दिले. लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं या मालिकेत दाखवण्यात आलय. त्यात अनिरुद्ध-अरुंधतीच्या या गोड डान्स परफॉर्मन्सने त्यांची जवळीक पुन्हा वाढलेली पाहुन सगळ्यांना आनंद झालेला दिसतोय.

 

हे खास भाग सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मात्र आता लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणारेय. हा खास भाग आज 14 मे रोजी प्रसारित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Recommended

PeepingMoon Exclusive