By  
on  

पाहा Photos : खऱ्या आयुष्यात अशी आहे संजना आणि अरुंधतीची मैत्री

आई कुठे काय करते ही मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. संजनामुळे देशमुख परिवार अडचणीत आल्याचं पाहायला मिळतय. एकीकडे अभिषेक त्याच्याच साखरपुड्यातून निधून गेला आणि आता चक्क अंकितासोबत लग्न करुन घरी परतलाय. या सगळ्यात संजनाचा हात असल्याचं अरुंधतीला प्रकर्षाने जाणवतय. त्यामुळे अरुंधती आता संजनाचा जास्त राग करु लागलीय. आधीच अनिरुद्ध अरुंधतीमुळे आपल्याकडे परत येत नसल्याचं पाहुन संजनाही अरुंधतीचा आणखी द्वेष करु लागलीय. या दोघींमध्ये शत्रूता वाढत चालली आहे. 

मात्र ऑनस्क्रिन जरी एकमेकांविषयी राग असला तरी ऑफस्क्रिन मात्र या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचं पाहायला मिळतय. संजनाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रुपाली भोसले तर अरुंधतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या दोघींची ऑफस्क्रिन चांगली मैत्री आहे. शॉट लागत असताना किंवा ब्रेक टाईममध्येही दोघी एकत्र वेळ घालवताना दिसतात.

रुपाली भोसलेने नुकतेच दोघींचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघी गप्पा मारताना आणि एकत्र हसताना दिसत आहेत. यावरुनच दोघींची चांगली बाँडिंग झाल्याचं पाहायला मिळतय.

आता ही मालिका पुढे काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता अरुंधती अनिरुद्धच्या आयुष्यातून निघून जाऊन त्याला घटस्फोट देऊन संजना कायमची त्याच्या आयुष्यात येईल का ? काय असेल या तिघांचं पाऊल हे पाहणं रंजक ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive