By  
on  

सादर होणार 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा 300 वा एपिसोड

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. मालिकेची कहाणी, विषय आणि कलाकार यांच कमाल कॉम्बिनेशन या मालिकेत पाहायला मिळतय. चार भावंडं आणि त्यांचा एकत्र परिवार असं सहकुटुंब या मालिकेत पाहायला मिळतय. मोठ्या भावाचा आदर करणारी आणि त्याचा शब्द पाळणारे त्याचे भाऊ या मालिकेत पाहायला मिळतात. 

लवकरच ही मालिका तब्बल 300 भाग पूर्ण करत आहे. या मालिकेचा 300 वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे याचं खास सेलिब्रेशन होणार एवढं नक्की. कलाकारांनीही ही गुड न्यूज सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या मालिकेत सरीता वहिनीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री नंदिता पाटकरनेही सोशल मिडीयावर पोस्ट शेयर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

नंदिता या पोस्टमध्ये लिहीतेय की, "आज 300 भाग साजरं करतोय. फक्त तुमचं प्रेम आणि आशिर्वादामुळे. तुम्हा सगळ्या सुंदर लोकांच्या प्रेमामुळे कायम कृतज्ञ आहोत. ही खूप जबरदस्त भावना आहे. इतकं छान कुटुंब असण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार च्या टीमचे खूप आभारी आहोत. स्टार प्रवाह वाहिनीचेही धन्यवाद ज्यांनी आम्हाला या मोठ्या परिवाराचा भाग करून घेतलंत."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

 

 तर स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवरुनही 300 भाग पूर्ण होत असल्याचं घोषीत करण्यात आलय. यात लिहीलय की, "आज सादर होत आहे 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा ३०० वा एपिसोड..
आपण या ३०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!त्याचबरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!"

या मालिकेत सध्या विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. हे सहकुटुंब तुटू नये यासाठी ही सगळी मंडळी काळजी घेत आहेत. मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. पुढे मालिकेत काय होईल हे पुढील भागांमधून समोर येईलच. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive