By  
on  

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील कलाकारांनी केलं खास सेलिब्रेशन, मालिकेने पूर्ण केले 300 भाग

कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच सध्या काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेचं चित्रीकरण सध्या सिल्वासा येथे सुरु आहे. नुकतच या मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं मालिकेने 300 भाग पूर्ण केल्याचं.

या मालिकेने नुकतेच 300 भाग पूर्ण केले आहेत. मालिकेच्या भागांचा इतका मोठा पल्ला गाठल्याने सेटवर खास केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी या मालिकेतील कलाकारही उत्साहात दिसले. सगळ्यांनी एकत्र मिळून हा आनंद साजरा केला आहे.

यावेळी या कलाकारांनी सेल्फि क्लिक केले, केक कापला आणि कामातून निवांत वेळ काढून मालिकेचे 300 भाग पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive