By  
on  

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर या कलाकारांची आहे ऑफस्क्रिन मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. यातच मालिकेत आयेशा देशमुख या नव्या पात्राची देखील एन्ट्री झाली आहे. सध्या मालिकेत विविध वळणावर नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे मालिका अतिशय रंजक ठरतेय. 

ऑनस्क्रिन विविध भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांची ऑफस्क्रिन मात्र घट्ट मैत्री आहे. नुकतच या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये हे कलाकार एकत्र निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. याशिवाय 48 वा दिवस असही त्यांनी यात नमूद केलय. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले होते. या मालिकेचही महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणाचा 48 वा दिवस की काय असाची नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय. 

या फोटोंमध्ये मालिकेत श्वेता, कार्तिक, आयेशा, लावण्या या भूमिका साकारणारे कलाकार एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. अभिनेता आशुतोष गोखले, अनघा भगरे,शाल्मली टोळ्ये, विदिशा म्हसकर हे कलाकार एकत्र दिसत आहेत. या कलाकारांची ऑफस्क्रिन चांगलीच मैत्री असल्याचं यातून पाहायला मिळतय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive