पाहा Video : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेचा नवा प्रोमो, 26 जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळणार आहे. येत्या 26 जुलैपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकेल. याशिवाय शिवबांचे शिलेदार आणि त्यांच्या शौर्याची गाथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यात पराक्रमी लढवय्ये बाजीप्रभू देशपांडे यांचीही कथा दाखवण्यात येईल. अभिनेता अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतून अजिंक्य देव यांना बाजीप्रभूच्या भूमिकेत पाहणं उत्कंठावर्धक ठरतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अंगावर काटा येणारं बाजीप्रभूंचा पराक्रम पाहायला मिळतोय. "लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.." म्हणत बाजीप्रभू आपल्या प्राणांची बाजी कशी लावतात हे यात पाहायला मिळतय. नुकताच प्रदर्शित झालेला हा थरारपूर्ण प्रोमो लक्षवेधी ठरतोय. स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे 'शूर सरदार' बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम या मालिकेतून पाहणं महत्त्वाचं ठरेल.

तेव्हा शिवबांच्या शिलेदांराची कथा आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share