By  
on  

पाहा Video : हा अभिनेता साकारणार महाराजांचा जिगरबाज मावळा वीर योद्धा शिवा काशिद यांची भूमिका

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर अनेक कलाकारा महाराजांच्या विविध मावळ्यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

महाराजांचा जिगरबाज मावळा वीर योद्धा शिवा काशिद यांचीही गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मलिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. ज्यात अभिनेता विशाल निकम हा शिवा काशिद यांच्या भूमिकेत झळकतोय. महाराजांसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या या मावळ्याच्या रुपात विशाल या मालिकेत पाहायला मिळेल. "आरं, शिवाजी राजा म्हणून मरतुया, आसं भाग्याचं मराण हजार येळा झेलाया तयार हाय ह्यो शिवा काशीद" असं म्हणत महाराजांच्या रुपातील शिवा काशिदचा करारी शूरवीर बाणा यात पाहायला मिळतोय. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून विशाल निकम लोकप्रिय झाला आहे. या मालिकेत त्याने ज्योतिबांची भूमिका साकारलीय. आता विशाल महाराजांचा मावळा शिवा काशिद यांच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही.

 

शिवा काशिदसह नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद यासारख्या शूरवीरांनी महाराजांसाठी जीवाची बाजी लावली. अशाच काही शूरवीर मावळ्यांची गाथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.  अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारताना दिसेल. 

तेव्हा शिवबांच्या या शिलेदारांची कथा या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive