पाहा Photos : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा हा नवा लुक पाहिला का ? या लुकचा मालिकेतील कथेशी असेल का संबंध ?

By  
on  

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होऊन आता दोघे वेगळे होणार आहेत. एवढच नाही तर अरुंधती सगळ्यांपासून दूर घर सोडून जाणार आहे. त्यामुळे मालिकेत सध्या काही भावुक क्षण पाहायला मिळत आहेत.

मात्र घटस्फोटानंतर जेव्हा अरुंधती घर सोडून जाईल तेव्हा देशमुख कुटुंबाचं घर अरुंधतीशिवाय कसे राहतील ? काय होईल पुढे ? हे सगळे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडलेत. तेव्हा या मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र आणखी एका गोष्टीने प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत.  या मालिकेत अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे प्रेक्षकांना हा प्रश्न पडलाय. 

मधुराणीने सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये मधुराणीचा शॉर्ट हेयर लुक पाहायला मिळतोय. मधुराणीच्या या लुकमध्ये प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. आता मधुराणीचा लुक बदलला म्हणजेच अरुंधतीचा लुकही बदलणार की काय ? या नव्या लुकमुळे मालिकेत काही नवं घडेल की काय ? असे अनेक प्रश्न समोर आलेत. 

 

तेव्हा मधुराणीच्या या नव्या लुकचा मालिकेशी काही संबंध आहे की नाही हे लवकरच समोर येईल एवढं नक्की. 

Recommended

Loading...
Share