पाहा Video : दीपाने आयेशावर उचलला हात, म्हटली "माझ्यातल्या आईला डिवचू नकोस"

By  
on  

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही दीपा आणि कार्तिकमधील दुरावा कायम आहे. दीपाने बाळांना जन्म दिल्यानंतरही कार्तिकने बाळांचा स्विकार केला नाही. यातच दीपाचं एक बाळ सौंदर्या इनामदार यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं आणि दीपाला तिचं दुसरं बाळ जन्माला आलच नसल्याचं सांगण्यात आलं. या गुंतागुंतीच्या कथेत आणखी एक पात्र लक्षवेधी ठरतय ते म्हणजे कार्तिकची मैत्रीण आयेशा. 

आयेशा आणि कार्तिकची जवळीक हळूहळू वाढू लागलीय. मात्र आयेशा कार्तिकच्या आयुष्यात सूड घेण्यासाठी आलीय. या सगळ्यात नुकतीच दीपा आणि आयेशाची भेट झालीय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या भेटीत दीपा आणि आयेशाचं भांडण झालय. या भांडणात दीपाने आयेशावर हात उचललाय. दीपाचं बाळं आणि कार्तिकचं काही नातं नसल्याचं आयेशा म्हणते आणि दीपाला प्रचंड राग येतो. या रागाच्या भरात दीपा आयेशाच्या कानशीलात लगावते. एवढच नाही तर दीपा म्हणते की,  "माझ्यातल्या आईला डिवचू नकोस".

एकीकडे दीपा तिच्या बाळासोबत पुढे निघून गेलीय. तर कार्तिक आयेशाच्या जाळ्यात सापडलाय. तेव्हा कार्तिकला त्याच्या बाळांची जाणीव होईल का ? दीपाचं दुरावलेलं दुसरं बाळ तिला परत मिळेल का ? काय असेल सौंदर्या इनामदारचं पुढचंं पाऊल हे या मालिकेतील आगामी भागात पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share