'आई कुठे काय करते' या मालिकेत एकामागोमाग एक अशा विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एका व्यक्तिने देशमुखांच्या घरात पाऊल ठेवलय. एकीकडे आता संजना आणि अनिरुद्धचं लग्न झालय. सगळ्या वादविवादानंतर दोघांची जवळीक पुन्हा वाढू लागलीय. या सगळ्यात आणखी एक ट्विस्ट मालिकेत आलाय.
संजना आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र येत असतानाच दारावर एका व्यक्तिचा आवाज येतो. ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून संजनाचा मुलगा निखील आहे. शेखर आणि संजनाचा मुलगा निखील आता आईसोबत राहण्यासाठी देशमुखांच्या घरी आलाय. तेव्हा या सगळ्यात निखीलमुळे अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल का हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
संजनाच्या घरात येण्यानं देशमुख कुटुंब नाराज झालय. या सगळ्यात अरुंधती देशमुख कुटुंबाला कसं सावरेल ? अरुंधतीच्या प्रकृतीत सुधार होईल का ? निखीलच्या येण्यानं संजना आणि अनिरुद्ध दुरावले जातील का ? काय असेल पुढील नवा ट्विस्ट हे या मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.