By  
on  

'इंडियन आयडॉल' पहिल्यांदाच येणार मराठीत, 'इंडियन आयडॉल मराठी' येणार लवकरच...

'इंडियन आयडॉल' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. 2004 साली या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे तब्बल 12 सिझन झाले आहेत. नव्या टॅलेंटला संधी देणं आणि उत्तम गायकांना व्यासपीठ देण्याचं काम हा कार्यक्रम करतो. मात्र हिंदीत प्रसिद्ध झालेला हा कार्यक्रम आता पहिल्यांदाच मराठीतही येतोय.

लवकरच 'इंडियन आयडॉल मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. नुकतच या वाहिनीच्या सोशल मिडीयावर याविषयी घोषणा करण्यात आलीय. ज्यात इंडियन आयडॉल मराठीचा उल्लेख करण्यात आला. यात लिहीलय की, "लवकरच...सोनी मराठी वाहिनीवर."

 

तेव्हा हा कार्यक्रम आता मराठीत येणार म्हटल्यावर मराठी प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढलीय. हा कार्यक्रम कधी येतोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. शिवाय या कार्यमात परिक्षक आणि सूत्रसंचालक कोण असले हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive