By  
on  

पाहा Photos : बाप्पा विशेष मराठी कार्यक्रमाच्या मंचावर थिरकली अंकिता लोखंडे

यंदा अनंत चतुर्दशीला झी मराठीवर "नव्या नात्यांचा श्री गणेशा" होणार आहे. नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत या वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. येत्या रविवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीला "नव्या नात्यांचा श्री गणेशा" हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.

'नव्या नात्यांचा श्री गणेशा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. शिवाय ह्या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी हा कार्यक्रम हातभार लावणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्या नात्यांचा श्रीगणेशा होणार आहे. या कार्यक्रमातून प्रहसन, गाणी आणि डान्स हे सगळंच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. प्रेक्षकांचे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील लाडके विनोदवीर निर्मिती ताईंसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

याशिवाय या कार्यक्रमात अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही विशेष उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अंकिताने 'चला हवा येऊ द्या'च्या विनोदवीरांसोबत मंचावर ठेका धरला.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अक्षया देवधर, नेहा खान, अस्मिता देशमुख यांचे धमाकेदार नृत्यसादरीकरणही प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्याचसोबत सलील कुलकर्णी, नंदेश उमप, अभिजीत सावंत यांचे सुमधुर परफॉर्मन्सेस सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive