मुलगी झाली हो ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेत माऊ मग नंतर साजिरी बनून सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री दिव्या सुभाषलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत घडणाऱ्या विविध गोष्टी चर्चेत असतानाच दिव्याच्या खऱ्या आयुष्यातील एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय.
मालिकेत शौनकसोबत विवाहबंधनात अडकलेल्या साजिरीचा खऱ्या आयुष्यातही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. साजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
नुकताच दिव्याचा टिळक समारंभ पार पडलाय. अक्षय घरतसोबत दिव्या लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलय. शिवाय या जोडीचे फोटोही सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. अक्षय हा न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. अक्षय आणि दिव्याची मैत्री मोठ्या कालावधीपासूनची आहे. मात्र या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. एवढच काय तर दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने तिच्या मालिकेच्या सेटवर जाऊन तिला सरप्राईज दिले होते.
तेव्हा लवकरच ही गोड जोडी लगीनगाठ बांधुन नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे लग्न नेमकं कधी असेल हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी त्यांच्या टिळक समारंभाचे फोटो समोर आले आहेत.